LIVE UPDATES

वनराई बंधारे उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान

पालक मित्र ही चांगली संकल्पना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 12:56 PM
views 37  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. कणकवली तालुक्यात 2,000 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज हरकुल बुद्रुक येथे स्वतः श्रमदान करत वनराई बंधारा उभारण्याचे काम केले. तसेच जिल्ह्यात पालक मित्र म्हणून ग्रामपंचायत मध्ये मित्र सहकारी म्हणून कामकाज पाहतील. निश्चितच भविष्यात याचा आपल्याला फायदा होईल.