
सावंतवाडी : येथिल २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. उभाबाजार व वैश्यवाडा येथील मारूती मंदिरात जात त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.
यावेळी उभाबाजार हनुमान मंदिर येथील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी रघुनाथ कोरगावकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शेखर धारगळकर, अरूण भिसे आदी उपस्थित होते. तसेच वैश्यवाडा हनुमान मंदिरात भेट देत दीपक केसरकर यांनी २१ दिवसांच्या गणरायाला वंदन केले. यावेळी संजय म्हापसेकर, दीपक म्हापसेकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












