
सावंतवाडी : सावंतवाडी पोलिस ठाण्यातील १९ दिवसांच्या गणरायाला शुक्रवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेशोत्सवात बंदोबस्तात तैनात असणारा खाकीतील माणूस या निमित्ताने विसर्जन मिरवणुकीत दंग झालेला दिसून आला.
गेले १९ दिवस पोलीस ठाण्यात गणरायाची सेवा पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांनी केली. काल रात्री मोठ्या भक्तिभावाने गण्याला निरोप देण्यात आला. रूचिका म्युझिकल माडखोल यांचा बेंजो पथक व स्थानिकांसह पोलीसांचा सहभाग असणार ढोलपथक मिरवणूकीच खास आकर्षण ठरल.
मिरवणुकीत बेंजोच्या तालावर पोलिस देहभान विसरून नाचले. लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याच साकडं घालत भक्तीभावाने निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.












