LIVE UPDATES

सावंतवाडी बसस्थानकात ५ नव्या बसेस

आमदार केसरकरांच्या हस्ते लोकार्पण
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 23, 2026 17:03 PM
views 302  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'राजमाता जिजाऊ' या नवीन आणि अत्याधुनिक बसेस ताफ्यात दाखल झाल्यात. सावंतवाडी बसस्थानकात यातील ५ नवीन बसेसंच आगमन आज झाले. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बसेसच लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पूजन करून तसेच श्रीफळ फोडून बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला. या बसमधून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सावंतवाडी शहराची सफर केली. या लोकार्पणास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे,  सत्यवान बांदेकर, बबलू मिशाळ, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. केसरकर म्हणाले, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यातून हे स्वप्न साकार झालं आहे. एकुण ३० गाड्या सावंतवाडी मतदारसंघासाठी देण्यात आल्या असून यातील ५-५ गाड्या वेंगुर्ला व दोडामार्ग तर १० गाड्या सावंतवाडीसाठी देण्यात आल्यात.‌ यातील पहिल्या ५ गाड्यांचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात या गाड्या येत असून जनतेची चांगली सेवा एसटीचे कर्मचारी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सावंतवाडी बसस्थानकाचे काम सुरु असून खड्डे पडलेल्या ठिकाणी तात्काळ काम केलं जाईल, गणेशोत्सवात गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.