LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषदेची ऐतिहासिक कामगिरी

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 12:41 PM
views 94  views

सावंतवाडी : नगपरिषदेचे सफाई कर्मचारी कै. धोंडू बरागडे यांचे 11 ऑगस्ट 2026 रोजी आकस्मिक निधन झाले. सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवून लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कै. धोंडू बरागडे यांचे वारसास म्हणजेच यश धोंडू बरागडे यांना सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते आज स्वतंत्र्य दिनी नियुक्ती पत्र देण्यात आले. 

मयत कर्मचा-याच्या वारसास सर्व कागदपत्रांचे कायदेशीर सोपस्कर पूर्ण करुन केवळ 3 दिवसांमध्ये नियुक्ती देणे ही ऐतिहासिक कामगिरी सावंतवाडी नगरपरिषदेने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रतील नगरपरिषदेच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हणून नोंद केला गेला आहे. याचप्रमाणे कै. धोंडू बरागडे यांचे वारसास सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन कुटुंब निवृती वेतन तसेच शासकीय नियमाप्रामणे इतर लाभही केवळ 3 दिवसांमध्ये प्रदान करण्यात आलेले आहेत.

एखादया कर्मचा-याच्या वारसास नियुक्त देणे तसेच निवृत्ती वेतन व इतर लाभ एवढ्या कमी कालावधीमध्ये देणारी सावंतवाडी नगरपरिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी सावंतवाडी नगरपरिषदेचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे मार्गदशनाखाली लेखापाल. प्रसाद बटवाल, आस्थापना विभागातील विजय बांदेकर यांचे प्रयत्नाअंती पार पाडली. यासाठी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा सौ. श्रध्दाराजे सावंत भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सर्व विषय समिती सभापती व सर्व नगरसेवक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.