LIVE UPDATES

बोर्डी पुलावर अपघात

वृद्ध जखमी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 13:32 PM
views 41  views

सावंतवाडी :  सावंतवाडी-आंबोली मार्गावरील बोर्डी पुलावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील गणपत राऊळ (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळी दहाच्या सुमारास बुर्डी पूल परिसरात रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षातील वृद्ध प्रवासी गणपत राऊळ हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सोहम हिरलेकर आणि शिवम हिर्लेकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. हिर्लेकर यांनी कोणताही विलंब न लावता तत्परता दाखवत जखमी गणपत राऊळ यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी वृद्धावर वेळीच उपचार सुरू होऊ शकले. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे.