LIVE UPDATES

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रम

दीपक केसरकर, निलेश राणेंची राहणार कार्यक्रमास उपस्थिती | शिवसेना महिला जिल्हाप्रमुखांची माहिती
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 12:25 PM
views 71  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट २०२६ रोजी नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना तसेच शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी पंखे वाटप करण्यात येणार आहे. तसेच लाखे वस्तीत पंखे वाटप करण्यात आले. 

याचबरोबर सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांमध्ये सुमारे ५ हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप, तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. तर गरजूंना छत्री वाटप करण्यात येणार आहे. रोणापाल येथील निराधार मुलांच्या छात्रालयामध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. कोंडूरा येथील विशेष शाळेत फळवाटप, आरोंदा येथील शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी नगरपालिका सफाई कर्मचारी यांना धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले. 

दरम्यान, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, माजी सभापती अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, झेवियर फर्नांडिस, परिक्षीत मांजरेकर, शरद धाऊसकर, नगरसेवक शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, महिला शहरप्रमुख भारती मोरे, स्नेहा टिळवे, राजन रेडकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, विनोद नाईक, क्लेटस फर्नांडिस, सचिन साटेलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌