
सावंतवाडी : कोकण विभागीय आयुक्त आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना, गौण खनिज व्यवहार, बायोमेट्रिक उपस्थिती, कार्यालयीन उपस्थिती, शासनस्तरीय संदर्भ, नागरिकांच्या तक्रारी तसेच जिल्हा प्रशासनाविरोधातील विविध प्रलंबित तक्रारींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "या दौऱ्यात संबंधित विषयांवर सखोल आढावा घेऊन दोषींवर योग्य कारवाई केली जाणार का? की हा दौरा केवळ औपचारिक बैठक, पाहुणचारापुरताच मर्यादित राहणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.











