LIVE UPDATES

पावरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या हिना सारंगचे यश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 15:36 PM
views 21  views

सावंतवाडी :  कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत इयत्ता ८ वी मधील कु. हिना जासीम सारंग हिने उत्कृष्ट कामगिरी बजावत  सब-ज्युनिअर गटातील ४३ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय तसेच प्रशालेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही ती अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास तिचा पालक व प्रशालेच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे. कु. हिना जासीम सारंग हिच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.