LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी भाई जेठे

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 16:43 PM
views 27  views

कणकवली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये अतीश रावजी जेठे उर्फ भाई जेठे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांना पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

अतीश रावजी जेठे  यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याद्वारे पक्षात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष विस्तारासाठी निश्चितच होईल, अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.