LIVE UPDATES

सावंतवाडीत जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक !

पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 13:04 PM
views 33  views

सावंतवाडी : नगरपरिषद नेहमीच क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत आली आहे. यावर्षीही सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित 'जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६' आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा इनडोअर स्पर्धा ४ जुलै ते ७ जुलै २०२६ दरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आल्यात, अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली आहे. 

या स्पर्धेपैंकी बॅडमिंटन स्पर्धा यामध्ये इयत्ता १ ली ते ५ वी विदयार्थी व विद्यार्थीनीं, इ. ६ वी ते १० विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि खुला गट यांच्यात होणार आहे. टेबल टेनिस स्पर्धा यामध्ये १४ वर्षांखालील विद्यार्थी व विद्यार्थींनी, १९ वर्षांखालील विद्यार्थी व विद्यार्थींनी आणि खुला गट, कॅरम स्पर्धा यामध्ये १४ वर्षांखालील - विद्यार्थी व वि‌द्यार्थीनी, १८ वर्षांखालील विद्यार्थी व वि‌द्यार्थीनी आणि खुला गट - सिंगल व डबल यांना सहभागी होता येणार आहे.

तसेच बुध्दीबळ स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील वि‌द्यार्थी व वि‌द्यार्थीनी, १६ वर्षांखालील - विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि खुला गट यांचा समावेश असणार आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये इ. १ ली ते ५ वी वि‌द्यार्थी व वि‌द्यार्थीनी (विषय - स्वच्छ सुंदर सावंतवाडी), इ. ६ वी ते १० वी विद्यार्थी व वि‌द्यार्थीनी (विषय- पर्यटनाची पंढरी, मोती तलाव आणि सावंतवाडीचे वैभव), इ. ११ वी ते १२ वी वि‌द्यार्थी व विद्यार्थिनी आणि (FY,SY, TY) विद्यार्थी व विद्यार्थिनी (विषय प्रजाहितदक्ष राजा श्रीमंत बापूसाहेब महाराज) या वयोगटामध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी फी माफ करण्यात आलेली आहे. खुल्या गटाकरीता सिंगलसाठी रु. १००/- आणि डबलसाठी रु. २००/- एवढे प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रामुख्याने प्रत्येक क्रिडा प्रकारामध्ये, प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धक आवश्यक आहेत. प्रत्येक खेळाडूस कोणत्याही एकाच क्रिडा प्रकारात आणि एकाच गटात खेळाण्यास परवानगी असणार असून स्पर्धेसाठी शाळेतील व खुल्या गटातील विद्यार्थ्यांची नावे न.प. कार्यालयाकडे ०१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत नगरपरिषद कार्यालयातील संबंधित क्रिडा प्रकारातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे नोंदवावयाची आहेत. या  स्पर्धेचे उदघाटन ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता बॅडमिंटल हॉल जिमखाना या ठिकाणी होणार असून  बक्षिस वितरण समारंभ ७ जुलै रोजी ४ वा. बॅडमिंटन हॉल जिमखाना या ठिकाणी संपन्न होणार आहे.