LIVE UPDATES

स्वच्छ व निर्जंतुक पाण्यासाठी राजू मसुरकरांचे खास प्रयत्न

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 21:41 PM
views 44  views

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक विहीरील कित्येक वर्षाचा गाळ उपसून स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना पिण्यासाठी मिळावे यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी नगरपालिकेमार्फत काम करून घेतले.

उपजिल्हा रुग्णालयात शेजारी पाचशे मीटरवर नगरपालिकेची सार्वजनिक विहीर असून सात ते  आठ वर्षांपूर्वी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील असताना रुग्णालयात पाण्याचा अपुरा पुरवठा असल्याचे आरोप होत होते. ती समस्या दूर होण्यासाठी राजू मसूरकर यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक विहिरी वरती पंप बसून पाईपलाईद्वारे सावंतवाडी रुग्णालयमध्ये पाणी आणून ही समस्या दूर केली होती. यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार निधीतून पाच लाख रुपयाचा निधी मंजूर करून मसुरकर यांनी घेतला होती. ही सार्वजनिक विहीर उपसा करून घेतल्याने रुग्णांना फायदा होणार असून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर व सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विनोद सावंत, दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केले.  यासाठी रुग्णांच्यावतीने जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आभार मानले आहे.