LIVE UPDATES

सावंतवाडीचे नगरसेवक जम्मु-काश्मिर दौऱ्यावर

प्रशिक्षण कार्यक्रमाच औचित्य ; २ दिवसांचा अभ्यास दौरा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 20:54 PM
views 609  views

सावंतवाडी : नागरी सेवा सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदा-या, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील महत्वाच्या तरतूदी, सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सावंतवाडीचे सत्ताधारी व विरोधी नगरसेवक श्रीनगर जम्मु-काश्मिर दौऱ्यावर असून दोन दिवसांचा हा अभ्यास दौरा असून प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना १९२६ साली झाली असून गेली ७६ वर्षे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांना निरनिराळ्या विषयावर प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. ७४ त्र्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविणे, नागरी दारिद्रय निर्मुलन, शहराचा आर्थिक व सामाजिक विकास, सार्वजनिक आरोग्य, झोपडप‌ट्टीवासियांचे पुर्नवसन अशा प्रकारच्या महत्वाच्या कामांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविलेली आहे. 

नगरपालिका कायद्यान्वये सोपविलेल्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी नगरपालिकेच्या अथवा स्थायी समितीच्या किंवा विषय समित्यांच्या सभेत निर्णय घ्यावे लागतात आणि अशा सभांमध्ये निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना नागरी सेवा सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदा-या, महाराष्ट्र नगरपालिका कायद्यातील महत्वाच्या तरतूदी, सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापन तसेच नियमांची व कार्यपध्दतीची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या माहिती अभावी काही वेळा लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना प्रभावीपणे काम करणे अडचणीचे होते. यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने नगरपालिकेतील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सामेत्यांचे सभापती व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी श्रीनगर जम्मु आणि काश्मिर येथे १९ व २० जून रोजी दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. या प्रशिक्षण सत्रात नागरी सेवा सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदा-या, अधिनियमातील तरतूदी, सभाशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन या विषयांचे संपूर्ण माहिती दिली जात आहे. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी याबाबतची माहिती दिली असून प्रशिक्षण सत्रांत अनुभवी व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यात आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड‌. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, स्नेहा नाईक, भाजपचे दिलीप भालेकर आदी सहभागी झाले आहेत.