LIVE UPDATES

शेर्ले ग्रामपंचायत निवडणूक | शामराव सावंत 6 विरुद्ध 3 मतांनी विजयी

भाजपाकडून शुभेच्छा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 20:40 PM
views 34  views

सावंतवाडी : शेर्ले ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपाचे उमेदवार शामराव सावंत हे 6 विरुद्ध 3 मतांनी विजयी होत निवडून आले. त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी जिल्हा बँक संचालक तथा भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शामराव सावंत यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा चिटणीस तथा पंचायत समिती सदस्य महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, मंडल चिटणीस बाळू सावंत, युवा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, मंडल कार्यकारिणी सदस्य राजेश चव्हाण, शक्ती केंद्रप्रमुख प्रवीण देसाई, मंडल युवा उपाध्यक्ष साई सावंत,बुथ अध्यक्ष अजित शेर्लेकर, बुथ अध्यक्ष दत्तात्रय देसाई, सामाजिक कार्यकर्ते विनोद सावळ तसेच इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, शेर्ले ग्रामपंचायतीच्या विकासासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकजुटीने कार्य करतील आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करतील. शामराव सावंत यांच्या निवडीमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.