
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील पडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्ता, भेडशी खानयाळे शिरंगे पुनर्वसन रस्ता, सावंतवाडी तालुक्यातील बांदा मच्छिमार्केट बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता कामास हा निधी मंजूर झाला आहे.
तीन ग्रामीण रस्त्यावरील सात कोटींच्या या तीन पुलांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या पुलांच्या कामांमुळे या परीसरातील गावांचा संपर्क सुलभ होणार असुन पावसाळयात निर्माण होणा-या वाहतुकीच्या व रहदारीच्या समस्या कायमस्वरुपी दुर होणार आहेत. माजी मंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. सावंतवाडी मतदार संघातील ग्रामीण भागातील जनतेला अत्यंत आवश्यक असणारी ही तीन पुले मंजूर केल्याबद्दल आमदार श्री. केसरकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.










