LIVE UPDATES

असनियेत विद्यार्थ्यांना वह्यांच वितरण

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 20:24 PM
views 15  views

सावंतवाडी : श्री देवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळामार्फत श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असनिये या दोन्ही शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांच वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे संस्थापक एम.डी.सावंत तसेच भरत सावंत ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण सावंत, चंद्रकांत भिसे,प्रार्थमिक शाळेच्या शिक्षिका सौ.गवस यांच्या उपस्थितीत या वह्यांच वितरण करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सावंत  यांनी आपल्या प्रास्ताविकपर  भाषणात श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळाच प्रशालेस लाभलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले. एम.डी.सावंत यांनी समाजातून मिळणार्‍या या दातृत्वाच ऋण कायम लक्षात ठेवून चांगला अभ्यास करून प्रशालेच्या उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.शैक्षणिक वर्ष 2025-26 दहावीचा निकाल 100% लागला याबद्दल प्रशालेच्या सर्व शिक्षक वर्गाचे कौतूक केले. श्रीदेवी माऊली असनिये ग्रामस्थ मंडळाच्या या योगदाना बद्दल पालक व ग्रामस्थ वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी जेष्ठ शिक्षक राठोड सर, लिपिक जी.बी.सावंत, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रशालेचे शिक्षक परेश देसाई यांनी केले.