LIVE UPDATES

मुक्ताईचे बाळकृष्ण पेडणेकर - मयुरेश मालवणकर जिल्ह्यातील पहिले राज्य बुदधिबळ पंच

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 12:19 PM
views 13  views

सावंतवाडी : महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशन यांनी संयुक्तरित्या रत्नागिरी येथे राज्यस्तरीय बुदधिबळ पंच-आर्बिटर लेखी परीक्षेचे आयोजन केले. रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशनतर्फे प्रथम दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा आणि पंच परीक्षेत राज्यातील तब्बल पंचेचाळीस जणांनी सहभाग घेतला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचा सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर व मालवणचा मयुरेश मालवणकर यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला आणि पंच परीक्षा दिली. पंच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बाळकृष्ण व मयुरेश चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र बुदधिबळ असोसिएशनने बाळकृष्ण व मयुरेश राज्यस्तरीय पंच झाल्याचे जाहीर केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी हे यश संपादन केले. ॲकेडमीच्या सचिव सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.