
सावंतवाडी : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कार्यरत असणारी ‘साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सुरू होत आहे. २२८ कोटी ठेवींचा टप्पा या संस्थेने पार केला असून उद्या मान्यवरांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या शाखेचा शानदार शुभारंभ करण्यात येणार आहे.
या नव्या शाखेच भव्य उद्घाटन सृष्टी इम्पेरिया बाजारपेठ येथे रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे. सर्व सभासद, ठेवीदार, पिग्मी खातेदार, कर्मचारी, हितचिंतक आणि नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून या निमित्ताने नूतन शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे तसेच विशेष उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री. जाधव व सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी आणि पिग्मी प्रतिनिधींनी केले आहे.











