LIVE UPDATES

आईच्या डोळ्यातील अश्रू बघून डॉक्टर होण्याचा निर्धार

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे सेवानिवृत्त
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 30, 2026 20:18 PM
views 21  views

सावंतवाडी : आईच्या डोळ्यातील अश्रू बघून डॉक्टर होण्याचा निर्धार केला‌ होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उस शेतीत काम करत असताना डॉक्टर होण्याची संधी मिळत असल्याचे पत्र आले. पुढे ३० वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा दिली. दोडामार्ग, सावंतवाडी भागात रुग्णसेवा सेवाभावातून रुग्णांवर उपचार केले अशी भावना सावंतवाडीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी व्यक्त केली. सावंतवाडी येथील सेवानिवृत्त समारंभात ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, सावंतवाडीत असताना एका मुलाचे निधन झाले. या दुःखातून सावरणं कठीण होतं. जिल्हा सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र, पत्नीने सावंतवाडीतील घर न सोडण्याचा निर्णय घेतला. यातून दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू झालो. एकट्याने रूग्णालय सांभाळल. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका आणली. राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. दोडामार्गला सर्जन, फिजीशीयन, स्त्रीरोगतज्ज्ञ या सर्व भूमिकात लोकांची सेवा केली. आज वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत असताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोड्युलर आयसीयू, सीटी स्कॅन, डायलेसीस सेंटर आदी गोष्टी करू शकलो याचा आनंद असल्याची भावना डॉ. ऐवळे यांनी व्यक्त केली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० वर्ष "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" मानून कार्य करणाऱ्या डॉ. ऐवळे यांचा सन्मान विविध क्षेत्रातील मंडळींकडून करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, उबाठा शिवसेनेचे बाबूराव धुरी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, ॲड. नकुल पार्सेकर, सौ. सीमा मठकर आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्ष किरण तंत्रज्ञ शिवाजी देवर्डेकर देखील आज सेवानिवृत्त झाले. त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी खास उपस्थिती राहत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात हा सेवानिवृत्त समारंभ पार पडला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निवासी अधिक्षक डॉ. सुबोध इंगळे, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, उबाठा शिवसेना नेते बाबुराव धुरी, डॉ. राजेश नवांगुळ, ॲड. नकुल पार्सेकर, सौ. सीमा मठकर, अशोक दळवी, राजू मसूरकर, डॉ पंकज पाटील, डॉ संजय वाळके, डॉ नित्यानंद मसूरकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. निखील अवधूत, डॉ. मणेर, सिस्टर राणे, डॉ सागर जाधव, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. राजेश गुप्ता, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. निखील अवधूत, डॉ. धीरज सावंत, डॉ. सागर जाधव, डॉ. संदीप सावंत, डॉ. रामदास रेडकर, सोनू गवस, प्रा. सतीश बागवे, देव्या सुर्याजी, पुंडलिक दळवी, देवा टेमकर, प्रथमेश प्रभू, रूपा मुद्राळे, हेलन निब्रे, साबाजी मांजरेकर, एकनाथ हळदणकर, डॉ. प्रवीण कुमार ठाकरे,  डॉ. संजय दळवी, डॉ. सौ. स्वार, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, भगवान गवस आदींसह सावंतवाडी व दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.