पत्रकार जय भोसले यांचा बांद्यात खास सन्मान

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 15, 2026 21:12 PM
views 17  views

सावंतवाडी : व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार जय भोसले यांचा बांद्यात सत्कार करण्यात आला.  पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' इंटरनेशनल फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून चांदा ते बांदा हे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे. अवघ्या पाच वर्षांत जगातील तब्बल  देशांमध्ये विस्तारलेल्या या संघटनेने आता सिंधुदुर्गमध्ये अधिक मजबूत पाय रोवले आहेत. या ९८ उपाध्यक्षपदी बांद्यातील पत्रकार जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, निलेश नाटेकर, निलेश उर्फ पापू कदम, भाजप युवामोर्चा शहर अध्यक्ष साई सावंत, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, शुभम साळगावकर, विकी कदम, निलेश देसाई, राज हरमलकर आदी उपस्थित होते.