LIVE UPDATES

‘कोकणसाद LIVE’ इम्पॅक्ट, गडनदीवरील केटी बंधाऱ्याच्या प्लेट बसवण्यास सुरुवात

पाणी अडवण्याच्या कामाला वेग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 05:30 PM
views 147  views

कणकवली : कणकवली शहरासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गडनदी पात्रातील कनक नगर येथील केटी बंधाऱ्यावर पाणी अडवण्यासाठी प्लेट बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे.

गडनदीतील केटी बंधाऱ्यावर प्लेट येऊन आठ दिवस झाले होते पण त्या प्लेट्स कधी बसवणार? असा प्रश्न उपस्थित करत ‘कोकणसाद Live’ ने दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. या पार्श्वभूमीवर आता बंधाऱ्यावर प्लेट बसवण्यास सुरुवात झाल्याने नदीपात्रात पाणी अडवण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या नदीतील पाण्यावर कणकवली शहरासह हरकुळ, हळवल, वागदे, सातरल, कासरल आणि कलमठ या गावांच्या पाणीपुरवठा याच नदीवरील पाण्याने होतो. त्यामुळे केटी बंधाऱ्यावर प्लेट बसवून पाणीसाठा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, बंधाऱ्यावर प्लेट बसवण्याचे काम पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे पाण्याची गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. ठेकेदाराने प्लेट व्यवस्थित बसवून पाणी अडवण्याची प्रभावी व्यवस्था केल्यास उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित विभागाने कामाचा दर्जा आणि गळती रोखण्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ताजी बातमी

View all

Temple Federation representatives submit a memorandum demanding drought compensation for temple lands and authorised farmers in Ratnagiri
देवस्थान जमिनींसह अधिकृत वहिवाटदार शेतकऱ्यांना दुष्काळी नुकसानभरपाई द्या
October 23, 2026
Dr Prashant Paranjape addresses a Jal Samvad programme on drought concerns and water conservation in Dapoli
Dapoli water conservation : वॉटर लॉकडाऊनची भीती
October 23, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise reviewing facilities and welfare schemes for senior citizens
Sindhudurg senior citizen facilities : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र
October 23, 2026
संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
October 23, 2026
संबंधित बातम्या