LIVE UPDATES

आचिर्णेतील बायोडायव्हर्सिटी पार्कच्या अभ्यासासाठी शिष्टमंडळ कोल्हापूर विद्यापीठात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 04:21 PM
views 60  views

वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्कच्या उभारणीसंदर्भात माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आज(ता.२३) भेट दिली. या प्रकल्पाची संकल्पना, उभारणीची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत माहिती घेणे हा या भेटीचा उद्देश आहे.

सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत आचिर्णे येथे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला जिल्ह्यातील शिष्टमंडळाने भेट दिली.विद्यापीठात करण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कची ही या शिष्टमंडळाने पाहणी केली.येथील वनस्पतीशास्त्र प्राध्यापक व विभाग प्रमुख यांच्याकडून याबाबत माहिती जाणून घेतली.

आचिर्णे येथे साकारण्यात येणाऱ्या या जैवविविधता उद्यानाच्या उभारणीसाठी आवश्यक माहिती, तांत्रिक बाबी आणि नियोजन समजून घेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गपर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या भेटीसाठी पंचायत समिती  सभापती सिद्धेश रावराणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे विशेष कार्याधिकारी अजयकुमार सर्वगोड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, तज्ज्ञ सल्लागार वामन पंडित, प्राध्यापक गावडे, संदीप राणे, कनिष्ठ अभियंता शुभम दुधये आणि कंत्राटदार प्रतिनिधी राजू मुणगेकर यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ विद्यापीठात गेले होते.

ताजी बातमी

View all

Sindhudurg Collector Trupti Dhodmise reviewing facilities and welfare schemes for senior citizens
Sindhudurg senior citizen facilities : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र
October 23, 2026
‘कोकणसाद LIVE’ इम्पॅक्ट, गडनदीवरील केटी बंधाऱ्याच्या प्लेट बसवण्यास सुरुवात
October 23, 2026
संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
October 23, 2026
Rajapur illegal Goa liquor news : गोवा बनावटीच्या दारूविरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन
October 23, 2026
संबंधित बातम्या