
सावंतवाडी : बाजारपेठेत घडलेल्या दुर्घटनेवेळी वेळीच जाग आल्याने व इतरांना सावध केल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून बाजारपेठ वाचवणाऱ्या प्रकाश वेंगुर्लेकर यांचा नुकताच अनिल भिसे मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
बाजारपेठेतील या संकटसमयी प्रकाश वेंगुर्लेकर यांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान अत्यंत कौतुकास्पद ठरले. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या सत्कार सोहळ्यास हेमंत मुंज, प्रदीप नार्वेकर, परशुराम चौगुले, रत्नाकर माळी, प्रदीप नाईक, संदीप धारगळकर, अनंत मेस्त्री आणि इरफान शेख आदी उपस्थित होते. जिल्हा पत्रकार कार्यकारिणी सदस्य अनिल भिसे यांच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला. प्रकाश वेंगुर्लेकर यांच्या या धाडसाबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











