LIVE UPDATES

दाणोलीच्या वसंत बिलेचा सावंतवाडी पोलिसांकडून सन्मान

रस्त्यात मिळालेले पाकीट तेलंगणा येथील चालकाला केले परत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 24, 2026 17:35 PM
views 50  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : रस्त्यात मिळालेले पाकीट पोलिसांकडे देऊन प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या दाणोली येथील युवकाचा सावंतवाडी पोलिसांकडून सन्मान करण्यात आला. 

संबंधित पाकीट हे तेलंगणा येथील एका ट्रक चालकाचे होते. ते आपल्या ट्रकमधून गोवा ते तेलंगणा प्रवास करत असताना दाणोली येथे त्यांचे पाकीट रस्त्यावर पडले होते.

दरम्यान, हे पाकीट स्थानिक तरुण वसंत बिले यांना सापडले होते. त्यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने हे पाकीट आज सावंतवाडी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. यासाठी तेजस स्वार आणि दीप्तेश सुकी या सहकारी मित्रांनी पुढाकार घेतला.

 संबंधित मालकाची चौकशी करत तेलंगणा येथील ही व्यक्ती असल्यामुळे आपल्याला ते पाकीट कुरियर करा अशी मागणी केली. त्यानुसार हे पाकीट संबंधित मालकाला कुरिअर करण्यात आले. त्यात 4 हजार दोनशे रक्कम आणि कागदपत्रे होती. त्यामुळे संबंधित मालकांने त्यांचे आभार मानलेत. तर प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे पोलिसांनी या युवकांचा सन्मान केला