
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे उभारण्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असतानाच आता नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी नदीमध्ये बंधारे उभारण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. या उपक्रमाला सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडूनही पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातून वाहणाऱ्या गडनदीपात्रात बंधारे उभारण्यासाठी आज रेल्वे पुलाशेजारील संभाव्य जागेची पाहणी करण्यात आली.
कणकवली नगरपंचायत, महाराष्ट्र शासन, व्यापारी संघटना आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या माध्यमातून गडनदीपात्रात पाणी अडवण्यासाठी योग्य ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात आली. नदीपात्रात कोणत्या ठिकाणी बंधारे उभारल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी तहसीलदार दिशांत देशपांडे मुख्याधिकारी गौरी पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, नेहा सिंधू कृषी पदवीधर संघ सचिव संदीप राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ,रुपेश खाडये, विलास कोरगावकर , रोहन डीचोलकर, राजेश शिरवलकर उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all







