
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील एका विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून प्रिया चव्हाण असं त्या विवाहितेच नाव आहे.
माठेवाडा आत्मेश्वर मंदिर मागील इमारतीत हे कुटुंब राहत. राहत्या घरी त्या विवाहितेने आत्महत्या केली. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप समजू शकलेल नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. संबंधित विवाहिता ही फार्मसिस्ट होती. येथिल मेडिकलमध्ये ती काम करत होती. तिच्या पदरी लहान कन्या असून पती पुणे येथे कामानिमित्त असतात. सावंतवाडी येथील घरी सासू, सासरे, लहान मुलगी असा परिवार राहत होता. आज सकाळी तिनं राहत्या घरी गळफास लावल्याच निदर्शनास आले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मनोज राऊळ, अनिल धुरी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.