LIVE UPDATES

कुर्ली येथील सत्यवती राणे यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 17:59 PM
views 71  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : कुर्ली गावठणवाडी येथील रहिवासी कै. सत्यवती पांडुरंग राणे (वय ८७) यांचे आज सकाळी सातच्या सुमारास ओरोस येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी तसेच कुर्ली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. सत्यवती राणे यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सदानंद राणे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राणे यांच्या त्या मातोश्री होत.