देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे लाडवाडी येथील सत्यवान वामन लाड (वय ४२) यांचे गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच तळवडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सत्यवान लाड हे शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. तसेच गावातील कोणालाही मदतीची गरज भासल्यास ते नेहमी धावून जात असत. त्यांच्या या स्वभावामुळे परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अकाली निधनाने तळवडे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दिवाळीची भेट
November 06, 2026

उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’
November 06, 2026

देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
November 06, 2026

स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार
November 06, 2026
संबंधित बातम्या