LIVE UPDATES

संजू परब यांनी केले शालेय शिक्षणमंत्र्यांचे सावंतवाडीत स्वागत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 11:49 AM
views 14  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी माजी मंत्री, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश शंकर राऊळ, युवराज लखमराजे भोसले, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, नगरसेवक बाबू कुडतरकर, तुषार साळगावकर भूषण सारंग, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, शिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री दादा भुसे यांच्या सावंतवाडी आगमनावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.