
देवगड : सेवा संकल्प अभियानांतर्गत देवगड तहसीलदार कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात देवगड तालुक्यातील विविध शासकिय कार्यालयांचे प्रतिनिधी, अधिकारी सहभागी झाले होते.
या शिबिरांतर्गत सेतू विभागामार्फत देण्यात येणारे जात दाखले, वय अधिवास दाखले, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, शिधा पत्रिका अशा विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण तहसीलदार जाधव , निवासी नायब तहसीलदार विवेक शेट, निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, पुरवठा निरिक्षक गौतम सावंत आदींच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीराच्या अनुषंगाने तहसीलदार जाधव यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच ही तत्पर सेवा केवळ सेवा संकल्प अभियानापूरती नसून सदैव आपल्या सेवेसाठी तहसीलदार या नात्याने मी कटीबध्द असल्याचे उपस्थितांना आश्वासित केले. या सेवा संकल्प शिबीराचे नियोजन महसूल सेवक पुर्वाश्री आचरेकर यांन केले.










