LIVE UPDATES

पटवर्धन चौकातील महसूलची जागा नगरपंचायत भाजी मार्केट साठी द्या

माजी नगराध्यक्ष समीर नलवडेंची महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 04, 2026 10:42 AM
views 149  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीत  आप्पासाहेब  पटवर्धन चौक येथे जुने भाजी मार्केट असून लगतची जागा स.नं./ हि.नं.१९८ व १ क्षेत्र ०.०७ हि जागा  महसूल विभागाची आहे. कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुने भाजी मार्केट लगत महसूल विभागाची जागा आहे. ती जागा भाजी मार्केटमध्ये वर्ग करावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी नलावडे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.

महसूल विभागाची जागा मिळाली तर कणकवली भाजी मार्केट सुसज्ज होईल. याबाबतचा पत्रव्यवहार कोकण आयुक्त व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना करण्यात आला आहे. तरी आपण आपल्या अधिकारात त्या जागेबाबत लवकरात लवकर यो निर्णय घेऊन ती जागा नगरपंचायतीला वर्ग करावी, अशी विनंती मंत्री बावनकुळे यांना श्री. नलावडे यांनी केली आहे.