LIVE UPDATES

गरजू रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. हर्ष सागावकरांचा मदतीचा हात

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला पाच बेड भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 17:48 PM
views 28  views

सावंतवाडी : शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध डॉ. हर्ष ईश्वरा सांगावकर यांच्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' मार्फत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला त्यांच्या रुग्णसेवेसाठी नवे पाच फोल्डर बेड देणगी स्वरूपात देण्यात आल्या. 

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब  रुग्णांना त्यांच्या सेवेबरोबरच विविध प्रकारच्या रुग्णपयोगी वस्तू देखील या संस्थेच्या माध्यमातून पुरवले जातात. रुग्णांच्या सेवेसाठी फोल्डलर बेडचा तुटवडा नेहमी भासत असल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांच्याकडे बेडची मागणी केली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मागणीच्या दुसऱ्याचं दिवशीच संस्थेला सुमारे 60 हजार रुपये किमतीचे पाच नवे कोरे फोल्डर बेड देणगी स्वरूपात दिलेत. त्यामुळे आता रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून सेवा उपलब्ध होणार आहे.

गरजूंनी या रुग्णोपयोगी वस्तूंचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी  रवी जाधव, रूपामुद्राळे, समीरा खलील, शेखर सुभेदार यांनी केला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांचे आभार मानलेत. या फोल्डर बेडच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे शेखर सुभेदार, आमीन खलील व रवी जाधव उपस्थित होते.