
सावंतवाडी : माजगाव नाईकवाडा येथील निवृत्त शिक्षक गोविंद विठू सावंत (वय - ९९) यांचे सोमवारी सायंकाळी उशिरा निधन झाले. माजगाव परिसरात गोविंद गुरुजी म्हणून ते परिचित होते. उल्लेखनीय म्हणजे निधनापूर्वी त्यांनी आपले डोळे दान करीत समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, पुतण्या, नातू, नातसुना असा परिवार आहे. मालवणी रील स्टार तथा फोटोग्राफर ओंकार सावंत आणि सोमेश्वर सावंत यांचे आजोबा तर कस्टम खात्याचे निवृत्त हवालदार विठ्ठल उर्फ तातू सावंत यांचे काका होत.











