
कुडाळ : महावितरणचे निवृत्त अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग आणि ब्राह्मण सभा कुडाळ चे कार्यकर्ते पुरुषोत्तम वामन हर्डीकर ( दत्तनगर, कुडाळ, वय ७८ वर्षे) यांचे रत्नागिरीत मुलाकडे अल्प आजारानंतर आज बुधवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दुःखद निधन झाले.
अंत्यसंस्कार उद्या सकाळी दहा वाजता रत्नागिरीत होणार. पश्चात पत्नी,एक मूलगा, सून, मूलगी,जावई. नातवंडे असा परिवार आहे.








