LIVE UPDATES

एनडीआरएफ जवानांच्या मनगटावर प्रेमाची राखी

न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूरच्या विद्यार्थिनींचे रक्षाबंधन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 16:19 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर येथे देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल)च्या जवानांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी NDRF जवानांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेम, विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या. 

विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना बांधत ‘देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना बहिणीच्या प्रेमाची राखी’ असा भावनिक संदेश दिला.आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या NDRF जवानांप्रती विद्यार्थिनींनी व्यक्त केलेला आदर आणि कृतज्ञता यामुळे कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले. जवानांनीही विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या भावनेला दाद दिली.

यावेळी NDRF जवानांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनश्याम राणे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगम चव्हाण यांनी केले.