LIVE UPDATES

एसपीके महाविद्यालयात अध्यापक क्षमता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 16:32 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय ( स्वायत्त ) यामध्ये पाच दिवसीय अध्यापक क्षमता  विकास  कार्यक्रमाचे आयोजन  महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता विकास कक्ष  तसेच रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व भूगोल या विभागांच्या वतीने व मुंबई येथील वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

याप्रसंगी वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर मुंबईचे वरिष्ठ टेक्निकल ऑफिसर एन एन राव,सुधीर कुमार भगत, मिलिंद शीद्रुक, गोविंद चित्ते, मीनल ताम्हणकर, सरिता थोपटे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.आर.बी.शिंत्रे, दोडामार्ग विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यू एल देठे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी बी शिंदे डॉ.जी एस मर्गज, डॉ. यू सी पाटील, डॉ. व्ही.पी सोनाळकर,डॉ. वाय ए चौधरी, डॉ. व्ही टी अपराध, डॉ. यु आर पवार,डॉ एस व्ही पाटील, डॉ. सौ. उर्मीला मेस्त्री,डॉ. सौ एस आर वालावलकर, सौ एस एस सावंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग ज्यामध्ये  दोडामार्ग सायन्स कॉलेजचे डॉ. महेश पाटील, प्रा. एम.डी पटाडे ,एस आर एम कॉलेज कुडाळ चे श्रीकृष्ण रेडकर,वैभववाडी कॉलेजचे मुकुंद रावराने, डॉ.दर्शना कोरगावकर,डॉ. केशव पाखरे, डॉ.व्यंकटेश गोपुला, मयुरी पेडणेकर, यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज चे प्रा. अभिमान लवटे, कणकवली महाविद्यालयाचे प्रा. कपिल गडेकर, देवगड महाविद्यालयाचे श्री प्रशांत तेली, श्री कैलास मसगे, देवरुख कॉलेजच्या शिवांगी जोशी, अद्वैत टोपले, तसेच विविध महाविद्यालयांचे   लॅब असिस्टंट, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे  शिक्षकेतर कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक क्षमता विकास कार्यक्रमाचे समन्वय डॉ. डी.बी.शिंदे यांनी केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच लॅब असिस्टंट यांना प्रयोगशाळेतील उपकरणे दुरुस्त करण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये या उपकरणांचे देखभाल योग्य प्रकारे होऊ शकते असे ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.आरबी शिंत्रे यांनी या पाच दिवसीय क्षमता विकास कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. वेस्टर्न रीजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर मुंबईचे मुख्य तांत्रिक अधिकारी एन एन राव यांनी सांगितले की, महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेमध्ये विविध उपकरणे ही योग्य प्रकारची देखभाल नसल्याने व उपकरणांची दुरुस्ती माहित नसल्याने ही उपकरणे निकामी होऊन पडलेली असतात या उपकरणांची तांत्रिक माहिती घेऊन ती दुरुस्त केल्यास त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतो व हे ट्रेडिंग देण्याचं काम आम्ही करतो असे ते म्हणाले. वेस्टन रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर ही संस्था विद्यापीठ अनुदानित आयोग यांच्या वतीने चालवली जाणारी मुंबई विद्यापीठ संलग्न स्वायत्त संस्था आहे.या संस्थेमध्ये विविध उपकरणे उपलब्ध असून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी या उपकरणांची माध्यमातून आपले प्रयोग करू शकतात असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जी एस मर्गज यांनी केले तर आभार डॉ. वाय ए चौधरी यांनी मानले.