LIVE UPDATES

मदर क्वीन्‍स स्कूलमध्ये चिमुकल्यांचे रक्षाबंधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 16:27 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्‍स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या पुर्व प्राथमिक विभागात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर पारंपरिक वेशभूषा परिधान करून रक्षाबंधन सोहळ्यात आवडीने सहभाग घेतला. औक्षण करून विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधत मिठाईचे वाटप केले. 

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणातून विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. सेलिन बर्नार्ड, श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. अनघा आयरे, श्रीम. सिद्रा शेख यांनी विशेष मेहनत घेतली तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली. 

यावेळी सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज श्रीमंत लखमसावंत भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले, संचालक डी.टी. देसाई, सह-संचालक ॲड.शामराव सावंत,मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ. सतिश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.