LIVE UPDATES

राजाराम खोर्जूवेकर यांचे उपोषण मागे

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांची मध्यस्थी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 08:02 PM
views 53  views

कुडाळ : पाट गावातील प्रलंबित विकासकामे व मूलभूत सुविधांसाठी राजाराम विलास खोर्जूवेकर यांनी पुकारलेले उपोषण जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या मध्यस्थीने यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले. श्री. खोर्जूवेकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील विकासकामांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी निवेदन देऊन २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी हा लढा उभारल्याचे खोर्जूवेकर यांनी स्पष्ट केले.

उपोषण सोडवताना श्री. पावसकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून प्रत्येक वंचित घटकाला आणि नागरिकाला न्याय देण्याची ठाम ग्वाही दिली. प्रशासनाने या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.