
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून येलो अलर्ट देखील जारी केला आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










