LIVE UPDATES

ओरोस येथे उद्या गिरणी कामगारांची सभा

संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागातर्फे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 05:29 PM
views 23  views

कणकवली : गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार ९ डिसेंबरला नागपूरात गिरणी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गिरणी कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेत संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे सिंधुदुर्ग चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने हे मार्गदर्शन लाभणार आहेत, अशी माहिती संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

मुंबईच्या गिरण्यांमध्ये आयुष्य वेचलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाकडे १ लाख ७४ हजार १०२ गिरणी कामगार व वारसदारांनी सदनिकांसाठी अर्ज केले असताना, शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १५ हजार ८०० सदनिकांचे वाटप झाले आहे.

त्यामुळे उर्वरित कामगारांच्या मुबईतील हक्काच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुबईत हक्काचे घर मिळावे, सदनिकेसाठी अर्ज करू न शकलेल्या कामगारांना पुन्हा संधी मिळावी, १९८१ च्या संपातील कामगारांचा पुनर्वसन योजनेत समावेश करावा, संक्रमण शिबिरातील रिक्त घरे तातडीने वितरित करावीत, खोट्या संमतीपत्रांची छाननी करून ती रद्द करावीत, तसेच बॉम्बे डाईंग व न्यू पेट मिलच्या घराची सोडत त्वरित काढावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या तयारीसाठी आरोस येथे सभेचे आयोजन केले आहे. नागपूर येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार व त्याच्या वारसदारांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळी गिरणी कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

ताजी बातमी

View all

नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026
मासळीच्या पाण्यामुळे देवगडच्या रस्त्यांवर अपघातांचा धोका
November 23, 2026
Two-day district-level adolescent health training workshop organised by Sindhudurg Zilla Parishad with UNICEF and Maharashtra Public Health Department.
किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कार्यशाळा
November 23, 2026
जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी अंजली खताते बिनविरोध
November 23, 2026
संबंधित बातम्या