
देवगड : भाजपच्या ओबीसी मोर्चाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांच्या हस्ते प्रमोद आंबेकर यांना नियुक्तीचे लेखी पत्र प्रदान करण्यात आले. पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यासाठी तसेच तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रमोद आंबेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.










