LIVE UPDATES

वकील महेश राऊळ यांचा विविध सामाजिक संस्थांच्यावतीने सत्कार

अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिकेत विनामूल्य मांडली बाजू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 21, 2026 21:37 PM
views 79  views

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय प्रकरणी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे सामाजिक बांधिलकीतून विनामूल्य जनहित याचिका लढविणारे वकील महेश राऊळ यांचा आज कोलगाव निवासस्थानी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सावंतवाडी सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै,सामाजिक बांधिलकीचे  पदाधिकारी रवी जाधव, आरोग्य आरोग्य कृती समितीचे अध्यक्ष एन.बी.रेडकर, राहुल परब, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष किशोर चिटणीस, सचिव अण्णा म्हापसेकर, सहसचिव राजू केळुसकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, आरोग्य कृती समितीचे क्रूझ फर्नांडिस, रविंद्र ओगले, ग्राहक पंचायतीचे प्रा.सुभाष गोवेकर, सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे, समिरा खलिल, परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशिल आमुणेकर, राहुल राणे, महादेव गावडे, अर्थव गावडे, रोहित जाधव, अजित नाईक, अक्षय नाईक, सामाजिक बांधिलकीचे लक्ष्मण कदम, साधना तेंडुलकर/धोंड आदी विविध संस्था पदाधिकारी उपस्थित होते. 

सावंतवाडीचे सुपूत्र असलेल्या श्री.राऊळ यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ आपल्या गावात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिके प्रकरणी सातत्याने बाजू मांडली. 

अभ्यासपूर्ण आणि सबळ पुराव्यांसह सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लावून धरला. त्यामुळे सर्कीट बेंच कोल्हापूरने सत्यशोधन समिती नेमून अहवाल मागवला. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलच्या जागेसंबधीचा प्रश्न पण ऐरणीवर आला. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने आज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, आरोग्य कृती समिती, जेष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने अँड. राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. अँड.राऊळ म्हणाले, अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.त्यासाठी सर्वांनी एकजूटीने एकत्र येऊन प्रयत्न, पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य प्रश्नावर होणारी फरफट थांबू शकेल.