LIVE UPDATES

सोलार पॅनल प्रकल्पातून २ हजार युवकांना रोजगाराच्या संधी

उद्योग मंत्री उदय सामंत : केसरकर यांच्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 20:02 PM
views 39  views

सावंतवाडी : आमदार निवडून देण्याचे काम जनताच करेल, दीपक केसरकर यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. अजून साडेतीन वर्ष आमदारकीची शिल्लक आहे‌. तसेच ४ हजार कोटींचा सोलार पॅनल प्रकल्पाचा एमओयू झाला असून २ हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प दोडामार्ग आडाळीत होत असून ४७ उद्योजकांची झालेली अडचण दूर करून त्यांना एमआयडीसीत जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहीत उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी दिली. 

जिल्ह्यात सर्वकाही चांगले घडत आहे. काल 'ताज'चा सामंजस्य करार झाला, तर आज दीपक केसरकर यांच्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होऊन त्यांचे स्वप्न साकार होत आहे. आडाळी एमआयडीसीत सोलर प्लांटसह अनेक उद्योग येत असून गरज पडल्यास तिचे विस्तारीकरणही करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच दीपक केसरकरांनी देखील सांगितलं की, आमदारकी जाहीर करण्याचा हा कार्यक्रम नव्हता. हा संजू परबांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता.

आमदार होत असताना आपण जर विविध विकासाची कामं केली, जनतेची कामं केली, तर जनतेमधूनच आमदार होण्याचा आवाज उठत असतो. हेच भाषण आणि हेच मार्गदर्शन दीपक केसरकर यांनी केलं. कुठेही दीपक केसरकर आणि संजू परब यांमध्ये वेगळं कुठलं तरी कॉम्पिटिशन सुरू झालंय अशातला हा भाग नाही. उलट त्यांनी स्वतःच्या वयामधल्या अंतराचा उल्लेख देखील केला. एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे.

नेत्याचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि मतदारांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी आमदार बनत नाही. तो प्रयत्न, आशीर्वाद मिळवण्याचा संजू परबांनी करावा असेही सांगितले.तर ४ हजार कोटींच्या प्रकल्पाचा सामंजस्य करार हा आमच्यासोबत होतोय. सोलरचे पॅनल बनवण्याचा हा प्रकल्प आहे. याच्यातून १,५०० ते २,००० लोकांना रोजगार मिळेल. आता जे ४७ उद्योजकांची अडचण झालेली होती जागेमुळे, ते ४७ प्लॉट्स हे उद्योजकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यातनं देखील १,२००-१,५०० लोकांना रोजगार मिळणार आहे.