
वेंगुर्ले : कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित "पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट" स्पर्धेमध्ये वेंगुर्ले येथील नाईक जिम च्या विद्यार्थ्यांनी बेस्ट जिम इन सिंधुदुर्ग, बेस्ट डेडलिफ्ट इन सिंधुदुर्ग या दोन मानाच्या किताबांसह अनेक मेडलची कमाई केली आहे. त्यामुळे नाईक जिम चे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाईक जिम, वेंगुर्ला मधील परशुराम केसरकर ५१ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये १ सुवर्णपदक, १ कांस्यपदक, नवीन काळसेकर ६६ कि.ग्रॅ. सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये २ रौप्यपदके, ईशान तल्हा ८३ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) २ सुवर्णपदके, १ रौप्यपदक, १ कांस्यपदक, पुरुषोत्तम सारंग ७० कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये सुवर्णपदक, १ कांस्यपदक, सोहम पेडणेकर ५९ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये २ सुवर्णपदके, १ रौप्यपदक, १ कांस्यपदक, अस्मी तल्हा ८० कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये ४ सुवर्णपदके पटकावली. तर अलिशा पालकर ५७ कि.ग्रॅ. ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये २ सुवर्णपदके, २ रौप्यपदके तसेच ज्युनिअर स्ट्रॉग गर्ल, डेडलिफ्ट स्ट्रॉग गर्ल म्हणून विशेष सन्मान झाला.
भूपेश वराडकर १०० कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये ४ सुवर्णपदके, सुमित नवार ७८ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग मध्ये १ कांस्यपदक, हितार्थ वागळे ७८ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये ४ सुवर्णपदके, निरज बागायतकर ५८ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये १ कांस्यपदक, साईराज मतोंडकर ५९ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये ४ सुवर्णपदके, पार्थ दाभोलकर ६३ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये १ कांस्यपदक, १ रौप्यपदक अनिश आरोसकर ९१ कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये १ सुवर्णपदक सोहम गवंडे ११० कि.ग्रॅ. सब-ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट), सिनिअर पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) मध्ये ४ रौप्यपदके आणि गौरव माने ५९ कि.ग्रॅ. वजनी गटात १ कांस्यपदक पटकावले आहे. सर्व विद्यार्थ्यांना नाईक जिम चे ट्रेनर ईश्वर माने, अमित नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










