
मालवण : एमआयटी पुणे कॉलेजचा सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन विभागाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात मालवण येथील ओंकार विकास गावकर यांने संपूर्ण कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याने डिस्टिंक्शन मध्ये येण्याचा मान मिळवून तो गोल्ड मेडलिस्ट बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार गावकर यांच्या यशाचा सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्गचा विद्यार्थी असलेला ओंकार याने पुणे येथे प्रथम येण्याचा मान मिळवत सिंधुदुर्गाची मान उंचावली आहे.
मालवण येथील ओंकार गावकर हा पुणे येथील महाराष्ट्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम. आय. टी. मध्ये शिकत होता. त्याने डिप्लोमा पुणे येथील ए. आय. एस. एस. एम. एस. या कॉलेजमधून पूर्ण केला होता. डिप्लोमामध्ये सुद्धा त्याने कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतरचे पदव्युत्तर शिक्षण त्याने पुणे येथिल एमआयटी मधून पूर्ण केले. डिग्री चा निकाल जाहीर झाला असून त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ओमकार विकास गावकऱ्यांनी यापूर्वी दहावी मध्ये सुद्धा ९७.६०% मार्क मिळवत कुडाळ हायस्कूल मधून चांगले यश मिळविला होता. आता त्याने डिग्री मधून सुद्धा प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.











