
सिंधुदुर्ग : आंध्र सरकार प्रमाणेच मच्छिमारी बंदी कालावधीत महाराष्ट्रात सरकारकडून गरजू मच्छीमारांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची घोषणा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. बंदी कालावधीत मदत स्वरूपात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मच्छीमारी बंदी काळात प्रत्येकी २० हजार देण्याची योजना आंध्रप्रदेश सरकारकडून राबविण्यात येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील मच्छीमारी बंदी काळात सरकारकडून मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बंदीच्या काळात हंगाम कधी सुरू होणार याची वाट बघत आमच्या मच्छीमार बांधवांना घरी रहावा लागत. त्यामुळे या काळात २० ते २२ हजार रुपये मदत स्वरूपात महाराष्ट्र सरकारकडून देण्याच नियोजन सुरू असून त्यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.










