LIVE UPDATES

एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

राजापूर-ओणी येथे २३ रोजी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन : ज्येष्ठ बालसाहित्यिक मदन हजेरी यांची प्रकट मुलाखत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 03:44 PM
views 23  views

कणकवली : राजापूर - ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि को.म.सा.प. शाखा, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, प्रसिद्ध स्तंभलेखक आणि बालकथाकार अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनात ज्येष्ठ बालसाहित्यिक मदन हजेरी यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

संमेलनाचे उद्घघाटन रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी दिली. अजय कांडर हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक म्हणून परिचित असले, तरी गेली अनेक वर्षे ते बालकथा आणि बालकविता लेखन करीत आहेत. यंदाही त्यांच्या बालकथा 'किशोर' दिवाळी अंकासह अनेक दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तर स्पर्श प्रकाशन, पुणेतर्फे लवकरच त्यांचा बालकथासंग्रह प्रकाशित होत आहे. 

आजवर त्यांनी महाराष्ट्रातील विविध १० साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर मदन हजेरी यांची मराठीतील ज्येष्ठ बालसाहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख आहे. ते माध्यमिक शिक्षक, पत्रकार, व्याख्याते आणि प्रकाशक म्हणूनही परिचित आहेत. हजेरी यांनी प्रथम १९९२ साली कोंबे गावात 'ज्ञानदीप' या नावाचे ग्रंथालय सुरू केले.

त्यानंतर २०१२ सालापर्यंत राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे ३० ग्रंथालयांची स्थापना केली. त्यांच्या झोकून देऊन केलेल्या कामामुळे कोकणातील बालसाहित्य चळवळीला बळकटी मिळाली. त्यांनी विविध पदे भूषविली असून मुलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना संस्कारक्षम करणारा 'बालविकास' नावाचा प्रकल्प त्यांनी राजापूर नगर वाचनालयातून चालविला. त्यांची ३५ हून अधिक बालसाहित्याची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

ओणी येथील सुप्रभा वाचनालय, कोंडिवले ते विद्यालयापर्यंत पुस्तक दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. यावेळी संमेलनाचे उद्घघाटक म्हणून जि.प. रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून को.म.सा.प.च्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर उपस्थित राहणार असून उद्घघाटनाचे सूत्रसंचालन प्रा. विकास पाटील करणार आहेत. 

दुपारी १२ वाजता 'लेखक आपल्या भेटीला' अंतर्गत बालसाहित्यिक मदन हजेरी यांची प्रकट मुलाखत होणार असून प्राचार्य डॉ. राजाराम राठोड आणि कवयित्री मुग्धा कुळ्ये त्यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी २ वाजता निवडक १५ शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन होणार असून त्याचे निवेदन प्रज्ञेश देवस्थळी करणार आहेत. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता १० संघांच्या सहभागातून प्रसिद्ध कवितांचे गायन होणार असून त्याचे निवेदन समीर देशपांडे करणार आहेत. सायंकाळी संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांच्या समारोप भाषणाने संमेलनाची सांगता होणार असल्याची माहितीही श्री. तुळसणकर यांनी दिली.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sainik School Exam Schedule : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक एनटीएकडून जाहीर
November 12, 2026