LIVE UPDATES

रिक्षाचालक दीपक चव्हाण यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 10:32 AM
views 131  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : ओरोस-गावडेवाडी येथील रहिवासी, उत्कृष्ट रिक्षाचालक आणि  झांजवादक दीपक रामचंद्र चव्हाण (६५) यांचे मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून, वारकरी म्हणून धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

दीपक चव्हाण हे उत्कृष्ट रिक्षाचालक म्हणून परिचित होते. तसेच वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने ओरोस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, भाऊ असा परिवार आहे.ओरोस येथील उत्कृष्ट पखवाजवादक ऋषिकेश चव्हाण यांचे ते वडील होते