LIVE UPDATES

गणेशोत्सवानिमित्त कोचरा गावातील कुटुंबांना शिधावाटप उपक्रम

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 16, 2026 14:47 PM
views 33  views

वेंगुर्ला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोचरा गावातील सर्व कुटुंबांसाठी कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश चतुर्थीनिमित्त शिधावाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. 

यावेळी उपस्थित पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, पं. स. सदस्य विष्णू फणसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, कोचरा सरपंच योगेश तेली, विभाग प्रमुख मितेश परब आदी मान्यवरांच्या हस्ते कुटुंबांना शिध्याचे वाटप करण्यात आले. तसेच कोचरे जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत गरिबांची घरे दुरुस्ती अंतर्गत मंजूर लाभार्थीना चेकचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा कोचरा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रा. प. सदस्य अनिल सुतार, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, स्वरा हळदणकर, प्रगती राऊळ, सुनीता परब, सौ नांदोस्कर, उर्मिला खडपकर, निवृत्त तहसीलदार सुभाष चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गणेशोत्सवाच्या आनंदात गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असावा आणि गरजू कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.