LIVE UPDATES

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी देवगड आगारातून ज्यादा बसफेऱ्या

१६ ते २५ सप्टेंबरदरम्यान नालासोपारा बससेवा; १९ ते २१ आणि २६-२७ सप्टेंबरला अतिरिक्त बसेस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 16, 2026 11:16 AM
views 46  views
Extra ST bus trips from Devgad to Mumbai Pune

देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातर्फे परतीच्या प्रवासासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान देवगड-नालासोपारा बस (दुपारी ३ वाजता) सुरू करण्यात येणार आहे.

तसेच १९ सप्टेंबर रोजी देवगड-बोरीवली तीन बस (दुपारी ३.३०, ३.४५ व ५), देवगड-मुंबई दोन बस (४.१५ व ४.४५), देवगड-कुर्ला नेहरूनगर एक बस (४.३०) आणि देवगड-ठाणे एक बस (४.१५) सोडण्यात येणार आहे.

२० सप्टेंबर रोजी देवगड-बोरीवली दहा बस (३.३०, ३.४५, ४, ४.१५, ४.४५, ४.५५, ५, ५.०५, ५.१० व ५.१५), देवगड-मुंबई तीन बस (४.१५, ४.३० व ४.४५), देवगड-कुर्ला नेहरूनगर दोन बस (४ व ४.३०), देवगड-ठाणे एक बस (४.१५) आणि देवगड-चिंचवड एक बस (५) सोडण्यात येणार आहे.

२१ सप्टेंबर रोजी देवगड-बोरीवली चार बस (३.३०, ३.४५, ४ व ५), देवगड-मुंबई दोन बस (४.१५ व ४.४५) आणि देवगड-कुर्ला नेहरूनगर एक बस (४.३०) उपलब्ध राहणार आहे.

तसेच २६ सप्टेंबर रोजी देवगड-बोरीवली दोन बस (४ वाजता व ५.१०) आणि देवगड-मुंबई एक बस (सायंकाळी ६) सोडण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी देवगड-बोरीवली एक विशेष बस सायंकाळी ४.५५ वाजता सोडण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई व उपनगरातून देवगडमध्ये आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी या ज्यादा बससेवेचा लाभ घेता येणार आहे.